Anuradha Vipat
सॅलडमध्ये कोणत्या भाज्या वापराव्यात हे केवळ चवीवर नाही, तर त्यातून मिळणाऱ्या पोषक तत्त्वांवर अवलंबून असते.
सॅलड अधिक चविष्ट आणि पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही खालील भाज्यांचा समावेश करू शकता.
लोह आणि कॅल्शियमसाठी कोवळा पालक उत्तम ठरतो. पांढरी किंवा जांभळी कोबी बारीक चिरून वापरल्यास सॅलडला चांगला 'क्रंच' येतो.
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी काकडी सर्वात महत्त्वाची आहे. टोमॅटो यात लायकोपीन असते, जे त्वचेसाठी चांगले असते.
व्हिटॅमिन 'ए' साठी किसलेले किंवा चकत्या केलेले गाजर वापरा. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीट उत्तम आहे. शिमला मिरची लाल, पिवळी किंवा हिरवी सिमला मिरची बारीक चिरून घातल्यास सॅलड आकर्षक दिसते.
जर तुम्हाला तिखट चव आवडत असेल, तर पातळ चिरलेला कांदा नक्की घाला.
मुलांना सॅलड आवडण्यासाठी त्यात उकडलेले मक्याचे दाणे टाका.