Anuradha Vipat
लिंबाचे खाटीक-गोड किंवा तिखट-मीठ घातलेले लोणचे जेवणाची चव दुप्पट करते.
लिंबाचे लोणचे मऊ, रसरशीत आणि वर्षभर न खराब होता टिकवण्यासाठी खालील सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स नक्की फॉलो करा.
लोणच्यासाठी नेहमी पातळ सालाची, डाग नसलेली आणि पूर्ण पिकलेली पिवळी धमक लिंबे निवडा.
लिंबे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ती कापडाने पूर्णपणे पुसून घ्या. त्यानंतर १ तास ती पंख्याखाली किंवा उन्हात सुकवून घ्या. लोणच्यात पाण्याचा एक थेंबही जाता कामा नये.
लोणचे टिकवण्यासाठी मीठ हे 'नॅचरल प्रिझर्व्हेटिव्ह' म्हणून काम करते. त्यामुळे मिश्रणात मिठाचे प्रमाण थोडे जास्त ठेवावे.
लिंबाच्या फोडी केल्यानंतर त्यांना आधी भरपूर मीठ आणि हळद लावून एका काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीत ५ ते ७ दिवस मुरु द्या. रोज ही बरणी हाताने हलवा.
जर तुम्ही तेलाचे लोणचे बनवत असाल, तर मोहरीचे किंवा शेंगदाण्याचे तेल कडकडीत गरम करून घ्या आणि नंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झालेले तेल लोणच्यावर ओता.