Anuradha Vipat
रात्रीचे जेवण संध्याकाळी ७:०० ते रात्री ८:०० या वेळेत करणे आरोग्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वात उत्तम मानले जाते.
आयुर्वेद आणि विज्ञानानुसार, सूर्यास्तानंतर मानवी शरीराची पचनशक्ती मंदावते, त्यामुळे उशिरा जेवल्यास थेट वजनावर परिणाम होतो.
तुम्ही झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी तुमचे रात्रीचे जेवण पूर्ण झालेले असावे.
लवकर जेवल्यामुळे शरीराला झोपण्यापूर्वी हालचाल करण्यासाठी वेळ मिळतो, ज्यामुळे खाल्लेल्या अन्नातील कॅलरीज चरबीमध्ये रूपांतरित न होता ऊर्जेत बदलतात.
लवकर जेवल्याने छातीत जळजळ किंवा अपचनाचा त्रास होत नाही. चांगली झोप मिळाल्यामुळे शरीरातील 'कोर्टिसोल' नियंत्रित राहते.
रात्री ९:०० किंवा १०:०० नंतर जेवल्यास शरीर अन्नाचे पचन योग्य प्रकारे करू शकत नाही. हे न पचलेले अन्न चरबीच्या रूपात शरीरात जमा होते.
रात्री उशिरा शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढून वजन झपाट्याने वाढते