Anuradha Vipat
निरोगी आरोग्यासाठी ताक पिण्याची सर्वात योग्य वेळ दुपारच्या जेवणानंतर असते .
दुपारी जेवणानंतर ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि अन्नाचे पचन नीट होते.
सकाळी नाश्त्यानंतर ताक पिणे देखील फायदेशीर ठरू शकते, यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते.
रात्रीच्या वेळी ताक पिणे टाळावे. यामुळे सर्दी, खोकला किंवा कफ वाढण्याची शक्यता असते
ज्यांना पित्ताचा त्रास आहे, त्यांनी रिकाम्या पोटी ताक पिणे टाळावे.
ताकात 'प्रोबायोटिक्स' असतात जे पोटातील आरोग्यदायी बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात.
ताकात फॅट्स कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने वजन कमी करणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.