Anuradha Vipat
बाळाला दात येताना हिरड्यांना खाज सुटणे, लाळ गळणे, चिडचिड होणे आणि हलका ताप येणे हा अतिशय नैसर्गिक त्रास आहे.
या काळात बाळ हाताला पडेल ती वस्तू तोंडात टाकते, ज्यामुळे जंतूसंसर्ग होऊन जुलाब होण्याची शक्यता वाढते.
बाळाच्या हिरड्यांवर येणारी सूज आणि खाज कमी करण्याचा हा सर्वात जुना आणि सुरक्षित उपाय आहे. थंड स्पर्शामुळे हिरड्या बधिर होतात आणि बाळाला वेदनेपासून झटपट आराम मिळतो.
बाळाला दर्जेदार, बीपीए-मुक्त सिलिकॉन टीथर किंवा रबर रिंग द्या. हे टीथर देण्यापूर्वी थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून थंड केल्यास अधिक फायदा होतो.
थंड केलेले सफरचंद, गाजर किंवा काकडीचे मोठे तुकडे बाळाला चघळण्यासाठी द्या. बाळ ते गिळणार नाही याकडे स्वतः लक्ष ठेवा .
बाळाच्या तोंडाभोवती जमा होणारी लाळ मऊ कपड्याने सतत हलक्या हाताने पुसून कोरडी ठेवा. बाळाला बिब घालणे हा एक चांगला पर्याय आहे.
बाळ जास्त चिडचिड करत असल्यास त्याला जवळ घेऊन कडेवर कडेवर फिरवा, त्याच्याशी गप्पा मारा.