Anuradha Vipat
आईचा दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी तिला तिच्या आवडीनुसार खालीलपैकी एखाद्या ठिकाणी नक्की घेऊन जा.
जर आईला खवय्येगिरीची आवड असेल, तर तिला तिच्या आवडीच्या ठिकाणी 'लंच' किंवा 'डिनर'ला घेऊन जा.
तिच्यासोबत निवांत वेळ घालवा. तिथे तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकता.
आईला एखाद्या शांत मंदिरात किंवा तिच्या श्रद्धेच्या ठिकाणी तिला घेऊन जाणे तिच्यासाठी खूप सुखद ठरेल.
तिला एखादे 'रिलॅक्सिंग मसाज' किंवा 'स्पा सेशन' भेट द्या.
जर आईला नाटकं किंवा चित्रपट बघायला आवडत असतील, तर एखाद्या दर्जेदार मराठी नाटकाचे तिकीट बुक करा.
तिला हवी असलेली साडी, दागिना किंवा तिच्या आवडीची वस्तू घेण्यासाठी तिला शॉपिंगला घेऊन जा.