Anuradha Vipat
शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी सकस आहार आवश्यक आहे. सकस आहारामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि वाढ चांगली होते.
यामध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते
गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी यांसारख्या धान्यांमध्ये कर्बोदके आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात
डाळी, कडधान्ये, अंडी, मासे, मांस यांसारख्या पदार्थांमध्ये प्रथिने भरपूर असतात.
दूध, दही, पनीर यांसारख्या पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
संतुलित प्रमाणात चरबी देखील आवश्यक आहे परंतु ती कमी प्रमाणात आणि निरोगी चरबी असायला हवी.
सकस आहारामुळे शरीराची योग्य वाढ आणि विकास होतो.आजारांपासून संरक्षण मिळते.