Mahesh Gaikwad
सकाळी घेतलेले हेल्दी पेय तुम्हाला संपूर्ण दिवस उर्जा देते आणि ताजेतवाने ठेवते. दिवसाची निरोगी सुरूवात करण्यासाठी सकाळी रिकम्यापोटी पुढील पेये घेवू शकता.
सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसचे यामुळे पचन सुधारते आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते.
एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू टाकून घ्या. लिंबामध्ये व्हिटामिन - सी भरपूर असते. यामुळे इम्युनिटी वाढते आणि शरीर डिटॉक्स होते. तसेच वजन नियंत्रणात राहते.
जिऱ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि दाहविरोधी गुधर्म असतात. जे पचनक्रिया मजबूत करतात.
सकाळी रिकाम्यापोटी मेथीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखऱ नियंत्रणात राहते. तसेच मेटाबॉलिझम वाढते.
कोथंबिरीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, जे मधुमहासाठी फायदेशीर असते.
ग्रीन टीमध्ये अँटि-ऑक्सिडंट्स असतात. यामुळे मेटाबॉलिझम वाढते आणि फॅट बर्निंगसाठी मदत होते.
कोरफडीच्या रस प्यायल्याने शरीर शुद्ध होते. तसेच पचन सुधारते, त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो आणि शरीर हायड्रेट राहते.