Anuradha Vipat
वजन कमी करण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरातील काही मसाल्यांचाही वापर करू शकता. चला जाणून घेऊयात असे कोणते मसाले आहेत जे झटपट वजन कमी करतील.
तुम्हाला जर झटपट वजन कमी करायचे असल्यास वेलचीचे पाणी खूप फायद्याचे ठरेल. वेलीमध्ये मेलाटोनिन असते. त्यामुळे तुमचे चयापचय वाढवते. तसेच फॅट कमी करण्याची प्रक्रिया वेगाने होते
वजन कमी करण्यासाठी बडीशेपचे पाणी पिणे देखील खूप फायदेशीर आहे. यात फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.
अदरकचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते तसेच गॅस आणि सूज देखील कमी होते. यामुळे पचनक्रियाही सुधारते.
ब्लॅक कॉफीमध्ये दालचिनी मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
हळदीमध्ये कर्क्युमिन असते, जे वजन कमी करण्याबरोबरच रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
ओव्याचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. ओव्यामध्ये असलेले थायमॉल नावाचे तत्व पचन सुधारते, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन वजन कमी होते.