Swarali Pawar
आंतरपीक पद्धतीमुळे आर्थिक जोखीम कमी करण्यास मदत होते. एक पीक कमी आले तरी दुसऱ्या पिकातून उत्पन्न मिळू शकते.
एकाच शेतात एकावेळी दोन किंवा अधिक पिके घेणे म्हणजे आंतरपीक. मुख्य पीक आणि पूरक पीक यांचे योग्य नियोजन महत्त्वाचे असते.
आंतरपीक मुख्य पिकाशी पाणी आणि अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करणारे नसावे. कमी पावसात कमी कालावधीची पिके निवडणे अधिक फायदेशीर ठरते.
ज्वारी + तूर हे ३:३ किंवा ४:२ प्रमाणात घ्यावे. बाजरी + तूर हेही कमी पावसात उत्तम आंतरपीक मानले जाते.
कापसासोबत मूग किंवा उडिद १:१ प्रमाणात घेता येते. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि अतिरिक्त उत्पन्न मिळते.
भारी आणि सखोल जमिनीत कापूस + सोयाबीन योग्य ठरते. यासाठी लवकर तयार होणाऱ्या सोयाबीन वाणांची निवड करावी.
सोयाबीन + तूर हे ४:२ ओळीच्या प्रमाणात घ्यावे. यामुळे केवळ सोयाबीनपेक्षा उत्पादनात वाढ मिळू शकते.
मका + सोयाबीन २:२ तर मका + मूग १:१ प्रमाणात घ्यावे. कमी पावसातही ही आंतरपीक पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.