Anuradha Vipat
घराच्या आत किंवा कमी सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी सुंदर फुले फुलावीत असे वाटत असेल, तर इनडोअर फ्लॉवर प्लांट्स हा सर्वोत्तम पर्याय आहे.
काही फुले अशी आहेत जी सावलीत आणि घराच्या आतही अतिशय सुंदर उमलतात.
पीस लिली हे अतिशय लोकप्रिय इनडोअर झाड आहे. याला सुंदर पांढऱ्या रंगाची फुले येतात.
लाल, गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या चमकदार फुलांमुळे अँथुरियम घराला एक रॉयल लूक देतात. या झाडाला थेट उन्हाची गरज नसते
जर तुम्हाला रंगीबेरंगी फुले हवी असतील, तर आफ्रिकन व्हायलेट्स उत्तम पर्याय आहे.
ऑर्किडची फुले दिसायला अत्यंत आकर्षक आणि आधुनिक वाटतात. घराच्या आत मध्यम प्रकाशात आणि कमी पाण्यात ही झाडे अनेक महिने फुले देतात.
हे एक इनडोअर कॅक्टस प्रजातीचे झाड आहे, ज्याला थंडीच्या दिवसात सुंदर लटकणारी गुलाबी किंवा लाल फुले येतात.