Anuradha Vipat
पावसाळ्यात त्वचा चिकट होणे ही सामान्य गोष्ट आहे. चला तर मग आजच्या या लेखात हा फेस मास्क कसा बनवायाचा याबद्दल जाणून घेऊयात.
काकडी आणि कोरफड जेलचा फेस मास्क त्वचेला ताजेतवाने करण्यासाठी सर्वात फायदेशीर आहे. हा मास्क चेहऱ्याला थंडावा देते आणि मृत त्वचा काढून नैसर्गिक चमक आणते.
चेहरा चमकदार करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर बऱ्याच काळापासून केला जात आहे. त्याचबरोबर मध त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे.
चेहऱ्यावरील हरवलेला चमक परत आणण्यासाठी लिंबू आणि बेसनाचा फेस मास्क हा देखील सर्वोत्तम मार्ग आहे. या मास्कच्या वापरामुळे त्वचा चमकदार आणि घट्ट होते.
चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटो सर्वात उपयुक्त आहे. अशातच तांदळाचे पीठ चेहऱ्यावरील घाण साफ करते आणि त्वचा स्वच्छ करते.
ग्रीन टी चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. दही त्वचा चमकदार आणि मऊ बनवते.
घरच्या घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून तुम्ही प्रभावी फेस मास्क बनवू शकता.