Swarali Pawar
रब्बी ज्वारीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात करावी. या वेळी ओलसर जमीन उत्तम परिणाम देते.
मध्यम ते भारी जमीन रब्बी ज्वारीसाठी सर्वोत्तम आहे. या जमिनीत ओल टिकते व पीक चांगले वाढते.
पावसाचे पाणी साठवण्यासाठी वाफे तयार करणे आवश्यक आहे. योग्य मशागत केल्यास उत्पादनात ३०-३५% वाढ होते.
फुले अनुराधा, फुले माऊली आणि फुले यशोमती हे वाण हलक्या जमिनीत चांगले उत्पादन देतात.
फुले सुचित्रा, परभणी मोती आणि मालदांडी-३५-१ मध्यम जमिनीत अधिक उत्पन्न देतात.
फुले वसुधा, फुले यशोदा, परभणी सुपर मोती व पीकेव्ही क्रांती हे भारी जमिनीत सर्वोत्तम आहेत.
बागायतीसाठी फुले रेवती व CSV-18 चांगले आहेत. तर हुरड्यासाठी फुले उत्तरा व फुले मधुर लोकप्रिय आहेत.
फुले सुचित्रा खोडकीड प्रतिकारक असून, परभणी ज्योती मावा किडीस प्रतिकारक्षम आहे. तसेच फुले रेवती आणि फुले यशोमती हे वाण खोडमाशीसाठी प्रतिकारक आहेत.