Morning Health Tips : सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याऐवीजी खा 'या' गोष्टी; आजारांपासून राहाल दूर

Anuradha Vipat

परिणाम

रोज सकाळी रिकाम्या पोटी आपण जे काही खातो किंवा पितो, त्याचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवर, ऊर्जेवर आणि संपूर्ण आरोग्यावर होतो.

Morning Health Tips | Agrowon

उत्साह

चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यास ऍसिडिटी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो, तर योग्य पदार्थांमुळे दिवसभर शरीरात उत्साह टिकून राहतो

Morning Health Tips | Agrowon

भिजवलेले बदाम

बदाम नेहमी रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी त्याची साल काढून खावेत. बदामाच्या सालीमध्ये 'टॅनीन' असते जे पोषक घटक शोषून घेण्यास अडथळा आणते.

Morning Health Tips | agrowon

भिजवलेले मनुके आणि खजूर

रात्री पाण्यात भिजवलेले ६-७ मनुके आणि २ खजूर सकाळी रिकाम्या पोटी खाणे अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये लोहाचे आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते.

Morning Health Tips | agrowon

मध आणि लिंबू

सकाळी चहा-कॉफी घेण्याऐवजी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा शुद्ध मध आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकून प्यावे. हे पेय शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.

Morning Health Tips | Agrowon

भिजवलेले मेथीचे दाणे

मेथी दाण्यांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, पचन सुधारते आणि केसांचे आरोग्यही उत्तम राहते.

Morning Health Tips | agrowon

पपई

सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे पोटासाठी अमृतासारखे काम करते. पपईमध्ये 'पपेन' नावाचे एन्झाईम असते, जे पचनक्रिया मजबूत करते आणि बद्धकोष्टतेचा त्रास कायमचा दूर करते.

Morning Health Tips | Agrowon

Boost Metabolism Naturally : चयापचय क्रिया वाढवा नैसर्गिकरित्या: हे ५ घरगुती ड्रिंक्स बदलतील तुमचा फिटनेस

Boost Metabolism Naturally | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...