Team Agrowon
हिरवळीचे पीक जमिनीत अन्न पुरवठ्याबरोबर तिचे भौतिक व रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत करते.
हिरवळीचे खत तयार करण्यासाठी प्रामुख्याने धैंचा, बोरु, शेवरी, बरसीम, सुबाभूळ, गिरीपुष्प, चवळी, मूग लागवड करतात.
धैंचा हे तागापेक्षा काटक असे हिरवळीचे पीक असून कमी पर्जन्यमान, पाणथळ ठिकाण, क्षारमय अथवा आम्लधर्मीय जमिनीत सुद्धा हे पीक तग धरू शकते.
या वनस्पतीच्या मुळांवर तसेच खोडावरही गाठी दिसून येतात या गाठीमध्ये रायझोबियम जीवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात.
लागवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बियाणे पावसाळ्याच्या सुरूवातीस शेतात पेरावे. पेरणीपूर्वी रायझोबियम जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया बियाण्यास करावी.
पिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करून पीक ६ ते ७ आठवड्यात ९० ते १०० सेंमी उंचीपर्यंत वाढले असता जमिनीत नांगराने गाडून टाकावे. या काळात धैंच्यापासून १० ते २० टनापर्यंत हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते.
या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण ०.४६ टक्के इतके आहे. भात लावणी करण्यापूर्वी आठ दिवस पीक जमिनीत गाडल्यास हेक्टरी ८० किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते.