Best Foods To Eat In Summer: उन्हाळ्यात 'या' ८ सुपरफूड्सचे करा सेवन, शरीराला मिळेल थंडावा

Deepak Bhandigare

टरबूज

उन्हाळ्यात टरबूज खावे, कारण यात असलेले सुमारे ९० टक्क्यांहून अधिक पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, यामुळे ताजेतवानेपणा टिकून राहतो आणि ऊर्जा मिळते

Best Foods To Eat In Summer | Agrowon

ताक

उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि पचनही सुधारते, यामुळे डिहायड्रेशन टाळण्यास मदत होते

Best Foods To Eat In Summer | Agrowon

काकडी

उन्हाळ्यात दररोज काकडी खाल्ल्याने शरीरातील पाणी पातळी टिकून राहण्यास मदत होते, कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे पचन सुधारते, तसेच शरीराचे तापमान नियंत्रणात राहते

Best Foods To Eat In Summer | Agrowon

नारळ पाणी

नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असल्याने शरीर हायड्रेटेड राहते, यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही

Best Foods To Eat In Summer | Agrowon

पुदिना

पुदिनात नैसर्गिक शीतलता गुणधर्म असतात, ज्यामुळे तणाव, डोकेदुखी कमी होण्यास मदत होते, पोटातील जळजळही कमी होतो आणि उष्माघाताचा धोका कमी होऊ शकतो

Best Foods To Eat In Summer | Agrowon

संत्रा

संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, दररोज एक संत्रे खाल्ल्याने उन्हाळ्यात संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो

Best Foods To Eat In Summer | Agrowon

पपई

उन्हाळ्यात पपई खाल्ल्याने त्वचा तजेलदार राहते, कारण त्यात त्वचेसाठी गुणकारी असलेले व्हिटॅमिन सी असते

Best Foods To Eat In Summer | Agrowon

लिंबू पाणी

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहण्यास मदत होते, यामुळे शरीराला विविध संसर्गांपासून संरक्षण मिळते

Best Foods To Eat In Summer | Agrowon
Kokum Health Benefits | Agrowon
Kokum Benefits: उन्हाळ्यात कोकम आहे वरदान, जाणून घ्या त्याचे ७ फायदे