Anuradha Vipat
कॅफीनमुळे तात्पुरती ऊर्जा मिळते, पण नंतर थकवा येतो त्यामुळे ते पिणे टाळावे
पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्याने, फळे आणि भाज्या ऊर्जा वाढवतात आणि थकवा कमी करतात.
ब्राऊन राईस, ओट्स यांसारखे संपूर्ण धान्ये, हळू-हळू ऊर्जा सोडतात, ज्यामुळे दिवसभर आपल्याला उत्साही वाटते.
मांस, मासे, अंडी, कडधान्ये आणि शेंगा यांसारखे प्रथिनेयुक्त पदार्थ स्नायूंना ऊर्जा देतात आणि थकवा कमी करतात.
पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे, कारण निर्जलीकरणामुळे थकवा येऊ शकतो.
पालक, डाळिंब आणि लाल मांस यांसारख्या लोहयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि थकवा कमी होतो.
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता थकवा निर्माण करू शकते, त्यामुळे आहारात मासे, अंडी आणि डेअरी उत्पादनांचा समावेश करा.