Anuradha Vipat
दाट, लांब आणि मजबूत केसांसाठी केवळ महागडी उत्पादने वापरण्याऐवजी शरीराला अंतर्गत पोषण देणे महत्त्वाचे आहे.
केसांच्या वाढीसाठी आहारात खालील ५ मुख्य अन्नपदार्थांचा समावेश करा.
अंड्यांमध्ये मुबलक प्रोटीन आणि 'बायोटिन' असते, जे केसांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. रोजच्या आहारात किमान १ ते २ उकडलेली अंडी समाविष्ट करा.
पालकामध्ये लोह, व्हिटॅमिन ए आणि सी मुबलक प्रमाणात असते.पालक रक्ताभिसरण सुधारून केसांच्या मुळांना मजबूत करतो.
ड्राय फ्रूट्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, झिंक आणि व्हिटॅमिन ई असते. हे घटक कोरड्या केसांना पोषण देतात, टाळूचा कोरडेपणा कमी करतात
रताळे आणि गाजरामध्ये 'बीटा-कॅरोटीन' असते, ज्याचे रूपांतर शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये होते. ह ज्यामुळे केस चमकदार होतात.
संत्री, लिंबू आणि आवळा यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. हे शरीरात लोह शोषून घेण्यास मदत करते आणि कोलेजन तयार करते, ज्यामुळे केसांचे तुटणे थांबते.