Anuradha Vipat
वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य दरवाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण याच ठिकाणाहून घरात सकारात्मक ऊर्जा, सुख आणि समृद्धी प्रवेश करते.
मुख्य दरवाजावर विशिष्ट फुलांचे आणि पानांचे तोरण लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष त्वरित नष्ट होतात.
झेंडूच्या फुलांचा सुगंध आणि रंग घरात आनंद निर्माण करतो. हे तोरण मुख्य दारावर लावल्याने वाईट शक्ती किंवा वाईट नजर घरात प्रवेश करू शकत नाही.
जास्वंदीचे लाल फूल आणि मोगऱ्याची पांढरी फुले यांचे तोरण लावल्याने देवी लक्ष्मी आणि गणेशजींचा आशीर्वाद लाभतो.
आंब्याची पाने नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि शुद्ध हवा घरात पाठवतात. तोरण बनवताना ५, ७, ११ किंवा २१ पाने वापरणे नेहमीच सर्वाधिक शुभ मानले जाते.
घर पूर्वमुखी असल्यास ताज्या आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावावे. यामुळे लक्ष्मीची कृपा टिकून राहते.
दारावर सुकलेली फुले किंवा कुजलेली पाने कधीही ठेवू नका. यामुळे उलट नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.