Face Yoga : म्हातारपणाची लक्षणे दूर ठेवण्यासाठी दररोज १० मिनिटे करा 'हे' सोपे फेशियल योगा

Anuradha Vipat

नैसर्गिक आणि प्रभावी उपाय

चेहऱ्यावरील सुरकुत्या, सैल पडलेली त्वचा आणि म्हातारपणाची लक्षणे दूर ठेवण्यासाठी दररोज फक्त १० ते १५ मिनिटे 'फेशियल योगा करणे हा सर्वात नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे.

Face Yoga | agrowon

फेशियल योगा

फेशियल योगामुळे चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो, रक्ताभिसरण वाढते आणि त्वचेतील कोलेजन टिकून राहते.

Face Yoga | agrowon

कपाळावरील सुरकुत्यांसाठी

दोन्ही हातांची बोटे कपाळावर ठेवा आणि बोटांनी त्वचा हलकीशी वरच्या दिशेने खेचून धरत भुवया वर उचलण्याचा प्रयत्न करा. ही स्थिती ५ ते १० सेकंद टिकवा.

Face Yoga | agrowon

सैलपणा टाळण्यासाठी

तोंड 'O' आकारात उघडा आणि वरचा ओठ दातांवर दुमडून घ्या. त्यानंतर गालाचे स्नायू वरच्या दिशेने उचलून हसण्याचा प्रयत्न करा.

Face Yoga | agrowon

डोळ्यांखालील सुरकुत्या आणि काळी वर्तुळे

दोन्ही हातांची मधली बोटे भुवयांच्या आतील कोपऱ्यावर आणि तर्जनी डोळ्यांच्या बाहेरील कोपऱ्यावर ठेवा. आता वरच्या दिशेने पाहत खालची पापणी वर उचलून डोळे किलकिले करा. ५ सेकंद धरून सोडा.

Face Yoga | agrowon

डबल चिन आणि जॉलाइनसाठी

मान मागे झुकवून छताकडे पहा आणि आपला खालचा ओठ वरच्या ओठावर नेऊन छताकडे किस केल्यासारखा आकार करा. गळ्याच्या स्नायूंवर ताण जाणवेल; ही स्थिती १० सेकंद ठेवा.

Face Yoga | agrowon

फुगा फुगवणे

तोंडात हवा भरून दोन्ही गाल फुगवा. ही हवा ५ सेकंद उजव्या गालात, ५ सेकंद डाव्या गालात आणि नंतर वरच्या व खालच्या ओठांजवळ फिरवा.

Face Yoga | agrowon

Garlic And Ginger : हृदयाचे आरोग्य सुधारणारे घरगुती उपाय: लसूण आणि आल्याचे फायदे

Garlic And Ginger | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...