Mahesh Gaikwad
शरीरात प्युरिन नामक पदार्थांचे विघटन जास्त प्रमाणात झाल्यामुळे युरिक अॅसिड तयार होते. युरिक अॅसिड जास्त वाढल्यामुळे सांधेदुखी आणि सूज येणे अशा समस्या उद्भवतात. ॉ
शरीरातील युरिक अॅसिड कमी करण्यासाठी ड्रायफ्रूट्स उपयुक्त आहेत. ड्रायफ्रूट्सच्या सेवनामुळे शरीरातील प्युरिन्सचे प्रमाण नियंत्रित राहते.
बदामामध्ये प्युरिन्स कमी असणारे ड्रायफ्रूट आहे. यातील फायबर आणि मॅग्नेशियममुळे युरिक अॅसिड कमी होण्यासाठी उपयुक्त आहेत.
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. हे सूज कमी करण्यासह युरिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.
मणुक्यांमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात. मणुके युरिक अॅसिड कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
पिस्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन हे दोन्ही घटक असतात. याचे सेवन केल्यास युरिक अॅसिडमुळे होणारी सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.
काजूमध्ये हेल्दी फॅट्ससह खनिजेही असतात. योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास मेटाबॉलिझम सुधारते आणि युरिक अॅसिडही नियंत्रणात राहते.
युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर उपयुक्त आहेत. यातील फायबर आमि अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराला ताकद मिळते.