Anuradha Vipat
केसांच्या समस्या जसे की केस गळणे, कोरडे होणे, कोंडा होणे किंवा कमी वयात केस पांढरे होणे या सर्वांचे मुख्य मूळ कारण शरीराला मिळणारे अपुरे पोषण हेच असते.
महागडे शॅम्पू किंवा तेल वरून लावण्यापेक्षा जर आपण आहारातून केसांना अंतर्गत पोषण दिले, तर केस मुळापासून मजबूत आणि चमकदार होतात.
केसांची रचना प्रोटीनने बनलेली असते, त्यामुळे केसांची वाढ होण्यासाठी आणि गळती थांबवण्यासाठी अंडी सर्वोत्तम आहेत.
शरीरात लोहाची कमतरता असल्यास केसांच्या मुळांना ऑक्सिजन मिळत नाही. पालक ही कमतरता दूर करून केस वाढवण्यास मदत करतो.
बदाम, अक्रोड, अळशी आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये 'ओमेगा-३ फॅटी ॲसिड' आणि व्हिटॅमिन ई असते. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होऊन केसांना नैसर्गिक चमक मिळते.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे कोलेजन वाढवतात आणि केस अकाली पांढरे होण्यापासून रोखतात.
यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी५ असते, जे केसांच्या मुळांना घट्ट पकडून ठेवण्यास मदत करते आणि केस गळणे कमी करते.