Anuradha Vipat
उन्हाळ्यात स्टायलिश दिसण्यासोबतच शरीराला थंडावा मिळण्यासाठी सुती कपडे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
या कुर्ती सैलसर असतात, ज्यामुळे शरीराला हवा लागते आणि घाम कमी येतो.
फुल लेन्थ कॉटन मॅक्सी ड्रेस उन्हाळ्यासाठी खूप ट्रेंडी आहेत. हे दिसायला स्टायलिश असतात .
हलक्या रंगाचे कॉटन अनारकली सूट हे वजनाला हलके आणि वावरण्यासाठी सोपे असतात.
ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी कॉटन शर्ट ड्रेस हा एक उत्तम फॉर्मल आणि कॅज्युअल पर्याय आहे.
कॉटनचे सैल पलाझो आणि त्यावर शॉर्ट कुर्ती किंवा टॉप घातल्याने उन्हाचा त्रास कमी होतो.
उन्हाळ्यात पांढरा, आकाशी, गुलाबी, लिंबू पिवळा यांसारखे फिके रंग निवडा, कारण ते उष्णता शोषत नाहीत.