Anuradha Vipat
मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते.
सकाळचा नाश्ता हा फायबर आणि प्रोटीनयुक्त असावा, ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल. यामुळे साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
यात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रिया संथ करते आणि ग्लुकोज हळूहळू रक्तात सोडते.
रात्रभर भिजवलेली मूग डाळ मिक्सरला लावून त्यात हिरवी मिरची, हळद, कोथिंबीर घालून नॉन-स्टिक तव्यावर कमी तेलात किंवा तुपात चिल्ला बनवावा.
२ अंड्यांच्या पांढऱ्या भागाचे ऑम्लेट भरपूर भाज्या टाकून बनवावे. पिवळा बलक खाणे टाळावे.
मेथी आणि पालक या पालेभाज्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स खूप कमी असतात आणि फायबर जास्त असते, जे मधुमेहामध्ये गुणकारी मानले जाते.
मोड आलेले मूग, मटकी किंवा चणे यामध्ये एन्झाईम्स, फायबर आणि प्रोटीन्सचे प्रमाण उत्तम असते. हे खाल्ल्याने दीर्घकाळ भूक लागत नाही.