Anuradha Vipat
हातात कडा घालणे ही केवळ फॅशन नसून, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार त्याचे विशेष महत्त्व आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार हातात कोणत्या धातूचा कडा घालावा हे तुमच्या समस्येवर किंवा राशीवर अवलंबून असते.
तांब्याचा संबंध सूर्य आणि मंगळ ग्रहाशी आहे. ज्यांची प्रकृती नेहमी नरम-गरम असते किंवा ज्यांना राग जास्त येतो त्यांनी तांब्याचा कडा घालावा.
चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी आहे. ज्यांना खूप मानसिक तणाव असतो त्यांच्यासाठी चांदीचा कडा शुभ असतो.
पितळ हा धातू गुरु ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. पितळेचा कडा घातल्याने भाग्योदय होतो आणि कामातील अडथळे दूर होतात.
हा आठ धातूंच्या मिश्रणाने बनलेला असतो. हा कडा सर्व नऊ ग्रहांचे दोष शांत करण्यासाठी प्रभावी मानला जातो.
लोखंडाचा संबंध शनि ग्रहाशी आहे. शनीची साडेसाती सुरू असल्यास लोखंडी कडा घालण्याचा सल्ला दिला जातो.