Mahesh Gaikwad
आजकाल आईस फेस वॉशचा ट्रेंड जोरात सुरू आहे. अनेकजण आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये बर्फाच्या पाण्याने चेहरा धुण्याची टीप्स फॉलो करत आहेत. पण त्वचेसाठी हे फायदेशीर आहे का?
थंड पाण्याने चेहरा धुतल्यामुळे त्वचेचा ताजेपणा मिळतो. बर्फाचे पाणी थंड असल्याने ते त्वचेचे तापमान कमी करून इन्स्टंट फ्रेश लुक देते.
बर्फाच्या पाण्याने चेहरा धुण्यामुळे त्वचेवरील रक्तप्रवाह सुधारतो आणि सूज कमी होते. चेहऱ्यावरील डागही कमी होतात.
थंड पाण्यामुळे त्वचेवरील मोठी रोमछिद्रे म्हणजेच पोअर्स आकुंचन पावतात व चेहरा गुळगुळीत व मुलायम दिसतो.
बर्फाचे पाणी त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करते, त्यामुळे पिंपल्सचा धोका कमी होतो.
चेहऱ्यावरील त्वचेला बर्फाच्या स्पर्श झाल्यामुळे त्वचेतील रक्ताभिसरण वाढते, त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक येते.
चेहरा धुताना जास्त वेळेपर्यंत बर्फाचा वापर करू नये. त्वचेला थेट बर्फ लावल्यामुळे इजा होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे नेहमी कापडात गुंडाळून बर्फ वापरावा.
योग्य पद्धतीने वापरल्यास बर्फाचे पाणी चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण प्रत्येक त्वचेचा प्रकार वेगळा असल्यामुळे वापरण्यापूर्वी त्वचा तज्ञाचा सल्ला घेंणे आवश्यक आहे.