Anuradha Vipat
व्हिटॅमिन सी सीरम हे चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी 'मॅजिक डोस'सारखे काम करते.
हे त्वचेतील मेलेनिनचे उत्पादन रोखते, ज्यामुळे पिंपल्सचे डाग, सनस्पॉट्स आणि काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते.
व्हिटॅमिन सी एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे, जे त्वचेचा थकवा दूर करून तिला नैसर्गिक चमक देते.
हे त्वचेमध्ये कोलाजन तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा घट्ट राहते आणि अकाली सुरकुत्या येत नाहीत
ते सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांमुळे होणाऱ्या त्वचेच्या नुकसानीला कमी करते
नवीन सीरम पूर्ण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी कानाच्या मागे लावून तपासा
व्हिटॅमिन सी लावल्यावर त्वचा प्रकाशासाठी संवेदनशील बनते, त्यामुळे दिवसा सीरम लावल्यानंतर त्यावर सनस्क्रीन लावणे विसरू नका.