Team Agrowon
वासरांचं कमी खर्चात कमी दूध पाजून चांगल्याप्रकारे संगोपन करण्यासाठी वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसरचा वापर करण हा पर्याय पुढे येतो
मिल्क रिप्लेसर म्हणजेच पोषक अन्नघटकांची कोरडी पावडर. ही पावडर स्निग्ध पदार्थ विरहित दूध पावडर, जीवनसत्त्व, क्षार, ॲन्टिऑक्सिडंट्स, उच्च प्रतीची प्रथिने यापासून बनवलेली असते.
ही पावडर पाण्यात योग्य प्रमाणात मिसळून वासराला दुधाप्रमाणे दिली जाते.
वासरांची शारीरिक वाढ चांगली होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक या मिल्क रिप्लेसरमध्ये असतात.
यामध्ये चव वाढवणाऱ्या घटकही मिसळलेले असतात. त्यामुळे मिल्क रिप्लेसर वासरे आवडीने पितात. हे मिल्क रिप्लेसर तुम्हाला कोणत्याही पशुखाद्याच्या दुकानात मिळतं
वासराच्या आहारात मिल्क रिप्लेसरचा वापर केल्यामुळे वासरा्ंच्या मरतुकीचं प्रमाण कमी होतं. त्यांची झपाट्याने वाढ होते.
रोगप्रतिकारकशक्ती वाढून वासरु आजारी पडण्याचं प्रमाणही कमी होतं.याशिवाय कमी खर्चात जातिवंत वासरांपासून पुढील काळात जास्त उत्पादन देणारी गाय आणि म्हैस आपण खात्रीने तयार करू शकतो.
Buffalo Management : म्हशींच्या चांगल्या आरोग्यासाठी हिवाळा फायद्याचा