Team Agrowon
वनस्पतीमध्ये गंधक हे प्रथिने, जीवनसत्वे आणि स्निग्ध पदार्थांमध्ये आढळते. पीक उत्पादन आणि गुणवत्तावाढीसाठी गंधक आवश्यक आहे.
गंधक हे प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढवण्यास मदत करते. यामुळे पिकाच्या अन्ननिर्मितीला चालना मिळते.
वनस्पतीमध्ये गंधक हे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि स्निग्ध पदार्थांमध्ये आढळते. हे तेलयुक्त पदार्थ वनस्पतींना तिखट वास प्रदान करते. उदा. कांदा, लसूण
गंधक हे अमायनो अॅसिड तयार करण्यास मदत करते. तो त्याचा घटक आहे. उदा. सिस्टीन व सिस्टाईन म्हणजेच प्रथिने तयार होण्यास गंधक आवश्यक आहे.
गंधक हा मिथीओनाईन, थायमीन आणि बायोटीन यांचा महत्त्वपूर्ण घटक आहे.
गंधक हरितद्रव्यांचा घटक नसला तरी हरितद्रव्य तयार होण्यास गंधकाची आवश्यकता असते. जर गंधक कमी पडल्यास १८ टक्क्यांपर्यंत हरितद्रव्य कमी तयार होते.
गंधक द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये वाढ होण्यास व जिवाणूद्वारे नत्र स्थिर करण्यास मदत करते.
वनस्पतींच्या निरनिराळ्या विकरांच्या व चयापचयाच्या क्रियेत मदत करते. फळे तयार होण्यास गंधकाची अत्यंत आवश्यकता असते.