Anuradha Vipat
उन्हाळ्याच्या कडक उन्हात उसाचा रस पिणे म्हणजे शरीराला तात्काळ थंडावा आणि ऊर्जा देणारा सर्वात नैसर्गिक मार्ग आहे.
उन्हाळ्यामुळे होणारा थकवा आणि डिहायड्रेशन रोखण्यासाठी उसाचा रस उत्तम पर्याय आहे.
जेव्हा उन्हामुळे ग्लानी किंवा चक्कर येते, तेव्हा उसाचा रस रक्तातील साखरेची पातळी वाढवून शरीराला झटपट ऊर्जा देतो.
आयुर्वेदानुसार, उसाचा रस यकृताचे कार्य सुधारण्यास मदत करतो.
उसाच्या रसात पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, जे पचन सुरळीत ठेवते.
उसाच्या रसात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते.यामुळे हाडे मजबूत होतात .
उन्हाळ्यामुळे येणारे मुरुम कमी करण्यासाठी आणि त्वचा चमकदार ठेवण्यासाठी याची मदत होते.