Anuradha Vipat
धावपळीच्या आयुष्यात दररोज किमान २ तास शांत बसल्याने तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सकारात्मक बदल घडू शकतात.
जेव्हा तुम्ही शांत बसता, तेव्हा मेंदूला विश्रांती मिळते. यामुळे विचारांचा गोंधळ कमी होतो आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुधारते.
शांततेमुळे मेंदूतील नवीन पेशींची निर्मिती होण्यास मदत होते ज्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते.
दोन तासांची शांतता रक्तदाब कमी करण्यास आणि शरीराला रिलॅक्स करण्यास मदत करते.
शांत बसल्याने तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि नवीन, सर्जनशील कल्पना सुचू लागतात.
शांत बसल्याने तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भावना, इच्छा आणि ध्येये यावर विचार करण्याची संधी मिळते.
शांतता तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवते. यामुळे चिडचिड कमी होते.