Anuradha Vipat
जर तुम्हाला सतत उदास वाटत असेल तर खालील काही सोपे उपाय तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यास मदत करतील.
मनातल्या भावना दाबून ठेवू नका. अनेकदा मनातल्या गोष्टी बाहेर काढल्याने मन हलके होते.
दिवसाचे एक साधे वेळापत्रक बनवा. सकाळी उठण्यापासून रात्री झोपण्यापर्यंतची कामे ठरलेली असतील तर मेंदूला दिशा मिळते.
व्यायाम केल्याने शरीरात 'एंड्रॉर्फिन' नावाचे 'फील गुड' हार्मोन्स तयार होतात, जे तणाव कमी करण्यास मदत करतात.
झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड आणि नैराश्य वाढते. दररोज ७-८ तासांची शांत झोप घ्या.
आहारात ताज्या भाज्या, फळे आणि सुकामेवा यांचा समावेश करा. जंक फूड टाळा.
तुम्हाला जे करायला आवडते त्यासाठी वेळ काढा.