Anuradha Vipat
पपईच्या एका वाटीने दिवसाची सुरुवात करण्याचे अनेक फायदे आहेत. पपई निवडताना ती पूर्णपणे पिकलेली आणि चमकदार रंगाची असावी
पपईमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार आणि ठेवण्यास मदत करतात.
पपईमध्ये व्हिटॅमिन ए असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते चांगले असते.
पपई रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते फायदेशीर आहे.
पपईमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
पपईमध्ये असलेले पोटॅशियम आणि फायबर हृदयासाठी चांगले असतात.
पपईमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पपईचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.