Organic Carbon : जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीचे फायदे

Team Agrowon

जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जेवढे जास्त तेवढे ते पीक उत्पादन आणि जमिनीच्या भौतिक गुणधर्माच्या संवर्धनाच्या दृष्टीने चांगले असते.

Organic Carbon | Agrowon

सेंद्रिय कर्बाची टक्केवारी शोधल्यास जमिनीतील एकूण नत्राच्या प्रमाणाचाही अंदाज लागतो.

Organic Carbon | Agrowon

सर्व वनस्पती, प्राणी आणि जिवाणूंचे कुजलेले आणि कुजलेले जमिनीतील अवशेष म्हणजेच सेंद्रिय द्रव्य होय. जमिनीतील एकूण सेंद्रिय द्रव्यामध्ये वनस्पतीचे अवशेष जास्त आढळतात.

Organic Carbon | Agrowon

सेंद्रिय द्रव्यात जवळपास ५८ टक्के कार्बन असतो. सेंद्रिय द्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यक मूलद्रव्याच्या साठवणीचे केंद्र असल्यामुळे जमिनीच्या उत्पादकतेचा निर्देशांक आहे.

Organic Carbon | Agrowon

सेंद्रिय द्रव्य धन आयन विनिमय क्षमता वाढविण्यासाठी, जमिनीची योग्य रचना राहण्यासाठी, जमिनीत ओलावा आणि हवेचे सुयोग्य प्रमाण राखण्यासाठी उपयुक्त असते.

Organic Carbon | Agrowon

जमिनीत मिसळलेल्या सेंद्रिय द्रव्याचे सूक्ष्म जिवांमुळे सतत विघटन होत असते.

Organic Carbon | Agrowon

जमिनीमधील सेंद्रिय कर्बाची सर्वसाधारण मर्यादा ०.४० ते०.६० टक्के योग्य मानली जाते. अशा जमिनीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म चांगले असतात.

Organic Carbon | Agrowon

योग्य प्रमाणात सेंद्रिय कर्ब असलेल्या जमिनीत पिकांची पोषण क्षमता योग्य असते. जमीन निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे शेतीमध्ये शेणखत, कंपोस्ट व इतर सेंद्रिय पदार्थाचा वापर फायदेशीर असतो.

Organic Carbon | Agrowon

Goat Milk : गायीच्या दुधापेक्षा शेळीचे दूध जास्त पोषक कसे?