Orange Peel : संत्र्याची साल चेहऱ्यावर करेल कमाल

sandeep Shirguppe

संत्र्याची साल

संत्र्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात त्याचा वापर त्वचेवर केल्यास चेहऱ्यावर चमक आणते.

कोरड्या त्वचेवर प्रभावी

आपली त्वचा कोरडी किंवा जास्त तेलकट असेल तर आपल्याला संत्र्याच्या सालीचा अधिक फायदा होऊ शकतो.

ड जिवनसत्व

आपली त्वचा तेलकट असल्यास संत्र्याच्या सालीतून आपल्याला ड जीवनसत्त्व व गुलाब पाण्याचा फायदा होईल.

गुलाब पाणी आणि संत्र्याची साल

संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये गुलाब पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर घट्ट लावून १५ ते २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

चेहऱ्यावरील डाग

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी आपण संत्र्याची साल, चंदन व लिंबाचा रस एकत्र करुन चेहऱ्याला लावावी.

स्क्रब तयार करण्यासाठी

नारळाचे दूध, साखर आणि संत्र्याच्या सालीची पावडर घालून बनवलेले स्क्रब नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते.

दही आणि संत्र्याची साल

संत्र्याच्या साली सोबत दह्याचा फेस पॅक बनवल्यास त्वचेला ग्लो येण्यास मदत होते.

फेस पॅक

आपल्या त्वचेला धूळ, प्रदूषण व ब्लॅकहेड्सपासून रोखण्यासाठी आपण संत्र्याची साल, बेकिंग सोडा व ओटमील स्क्रबचा फेस पॅक चेहऱ्याला लावू शकतो.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

आणखी पाहा...