Anuradha Vipat
ओमेगा-३ फॅटी ॲसिड हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असणारे एक निरोगी फॅट आहे.
आपले शरीर हे फॅट स्वतः तयार करू शकत नाही, त्यामुळे ते आहारातून किंवा सप्लीमेंट्सच्या माध्यमातून घेणे गरजेचे असते.
निरोगी हृदय, तीक्ष्ण मेंदू आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी ओमेगा-३ जादूई पद्धतीने काम करते.
ओमेगा-३ शरीरातील खराब कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड्सची पातळी कमी करते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होत नाही.
हे रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि रक्ताच्या गाठी होण्यापासून रोखते. त्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
आपल्या मेंदूचा सुमारे ६०% भाग फॅटने बनलेला असतो, ज्यामध्ये ओमेगा-३ चा वाटा मोठा असतो.
हे मेंदूच्या पेशींमधील संवाद सुधारते, ज्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते.