Anuradha Vipat
रात्री पचायला हलके जेवण करणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
जेव्हा तुम्ही रात्री कमी कॅलरीचे आणि पचायला हलके अन्न खाता, तेव्हा शरीराला ते पचवण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करावी लागत नाही ज्यामुळे रात्री वारंवार झोप मोड होत नाही.
हलके जेवण केल्याने वजन आणि विशेषतः पोटाचा घेर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
रात्री मूंग डाळ खिचडी, सूप किंवा उकडलेल्या भाज्या यांसारखे हलके अन्न खाल्ल्याने सकाळी पोट साफ होण्यास मदत होते.
रात्री हलके आणि फायबरयुक्त जेवण केल्याने साखर नियंत्रित राहते आणि रक्तदाब सामान्य राहून हृदयाचे आरोग्य सुधारते.
रात्री हलके जेवल्यास सकाळी उठल्यावर शरीर डिटॉक्स होते आणि तुम्हाला प्रचंड ऊर्जा व ताजेतवाने वाटते.
जर रात्री जड जेवण केले, तर सकाळी उठल्यावर डोके जड वाटणे, आळस आणि थकवा जाणवतो. कारण शरीर रात्रभर अन्न पचवण्याच्या कामात व्यस्त असते.