Sea Ecosystem : कांदळवनांचे निसर्गाला होणारे फायदे

Team Agrowon

नदी जिथे समुद्राला मिळते, तिथे खाड्या असतात. या खाड्यात उभी राहिलेली असतात ती म्हणजे कांदळवने!

Sea Ecosystem | Agrowon

किनारपट्टीवर येणारे वादळ लाटा व जमिनीची धूप यांच्यापासून संरक्षण मिळते. यामुळे होणारी मनुष्यहानी टळते. मालमत्तेचे संरक्षण होते.

Sea Ecosystem | Agrowon

जंगलातून इंधनासाठी लाकूड व जहाज बांधणीसाठीचे लाकूड मिळते. येथील झाडांमध्ये असलेली नैसर्गिक रसायने ही त्वचा विकार, पचन संस्थांचे विकार या कर्करोग व उच्च रक्तदाब रोखण्यामध्ये महत्त्वाची ठरतात. त्यामुळे औषधे निर्मितीमध्ये त्यांचा वापर होतो.

Sea Ecosystem | Agrowon

खाडीतील विविध कालव, खेकडे, मासे खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. भारतातील ४० टक्क्यांपेक्षाही अधिक लोकांचे अन्न हे सागरी जीवनावर अवलंबून आहे. जवळ जवळ सर्व सागरी जिवांचे जन्म व संगोपन स्थान हे कांदळवन आहे.

Sea Ecosystem | Agrowon

कांदळवनांमुळे किनारपट्टी परिसराचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण होते. सर्वप्रथम म्हणजे जमिनीची धूप होऊन गाळ समुद्रात जाण्यापासून वाचतो.

Sea Ecosystem | Agrowon

समुद्रकिनाऱ्यावर आदळणाऱ्या वादळांना अंगावर झेलून वाऱ्याची शक्ती व वेग कमी करण्याचे काम कांदळवने करतात. या सर्व बाबींचा अनुभव गेली शेकडो वर्ष येत आहे.

Sea Ecosystem | Agrowon

त्सुनामी व तत्सम आपत्तीमध्ये समुद्रात उठलेल्या महाप्रचंड लाटांपासूनही कांदळवनांमुळेच किनारपट्टीचे रक्षण होते.

Sea Ecosystem | Agrowon

पाण्याबरोबर वाहून आलेल्या सर्व सेंद्रिय पदार्थांचे अगदी जटिल सेंद्रिय पदार्थांचे पूर्ण विघटन होऊन पुन्हा निसर्गात मिसळण्याची प्रक्रिया इथेच होते. याच अर्थाने समुद्रासाठी ती मोठी गाळणी ही आहे.

Sea Ecosystem | Agrowon

हवेतील कर्ब वायू शोषून कार्बन जमिनीत स्थिर करण्याची कांदळवनांची क्षमता जमिनीवरील वनांच्या १० पट जास्त आहे.

Sea Ecosystem | Agrowon