Team Agrowon
चवळी हे शेंगायुक्त लवकर वाढणारे, पौष्टिक आणि चवदार चारा पीक आहे. हे एक उत्कृष्ट आच्छादन पीक आहे, तसेच जमीन सुपीकतेसाठी फायदेशीर आहे.
हे पीक ज्वारी, बाजरी, मका या चारा पिकाच्या सोबत लावले जाते. हा चारा जनावरे आवडीने खातात.
चवळीमध्ये कोरड्या पदार्थाच्या आधारावर सरासरी २०-२४ टक्के क्रूड प्रोटीन, ४३-४९ टक्के तंतूमय घटक, २३ ते २५ टक्के सेल्यूलोज आणि ५ ते ६ टक्के हेमिसेल्युलोज असते. या चाऱ्याची पचन क्षमता ७० टक्यांपेक्षा जास्त आहे.
पिकाच्या चांगल्या वाढीसाठी हलकी, मध्यम जमीन उत्तम मानली जाते. लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन आवश्यक असते. लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट आणि कुळवणी करावी.
मार्च महिन्याच्या मध्यावर या पिकाची पेरणी करावी. २ ते ३ सेंमी खोलीवर पेरणी करावी. ओळीतील अंतर २५ ते ३० सेंमी असावे. प्रति हेक्टरी ३० ते ४० किलो बियाणे वापरावे.
हिरव्या चाऱ्यासाठी चवळीची काढणी पीक ५०टक्के फुले आल्यापासून ते ५० टक्के शेंगा तयार होईपर्यंत पूर्ण करावी, अन्यथा त्यानंतर त्याचे खोड कठीण आणि जाड होते आणि चाऱ्याचे पौष्टिक मूल्य आणि चवीवर परिणाम होतो.
सुधारित जातींची लागवड केली तर सरासरी २५ ते ४० टन प्रती हेक्टरी हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.
Animal Care : गोठ्यातील गोचीड, माशा, उवा, पिसवा पळवून लावण्याचे उपाय