Anuradha Vipat
वांग्याला 'भाज्यांचा राजा' म्हटले जाते. वांग्यामध्ये लोह , फायबर आणि पोटॅशियम भरपूर असते.
लोहाचा चांगला स्रोत असूनही काही विशिष्ट शारीरिक समस्या असलेल्या लोकांनी वांगी खाणे टाळले पाहिजे.
ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी वांगी खाऊ नयेत, कारण यामुळे खडा मोठा होऊ शकतो.
ज्यांना वारंवार पित्त, जळजळ किंवा गॅसचा त्रास होतो, त्यांच्यासाठी वांगी त्रासदायक ठरू शकतात.
काही लोकांना वांगी खाल्ल्याने त्वचेवर खाज येणे, रॅशेस उठणे किंवा घशात खवखव होणे अशा ॲलर्जीच्या तक्रारी जाणवतात.
वांग्यातील 'नासुनिन' हे घटक शरीरातील लोह शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकतात.
ज्यांना सांधेदुखी किंवा संधिवाताचा त्रास आहे, अशा लोकांनी वांगी खाल्ल्याने सूज आणि वेदना वाढण्याची शक्यता असते.