Deepak Bhandigare
उडीद डाळ ही पोषणमूल्यांनी समृद्ध असून, त्यात असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते
उडीद डाळ हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानली जाते, कारण त्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी महत्त्वाची खनिजे असतात
उडीद डाळीत प्रथिने आणि फायबर असल्याने अधिक वेळ पोट भरलेले राहते, यामुळे वजन नियंत्रणात राहू शकते
उडदाच्या डाळीत लोहाचे प्रमाण अधिक असल्याने लाल रक्तपेशींच्या उत्पादनास मदत होते, या रक्तपेशी संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडतात
उडीद डाळीचे नियमित सेवन केल्यास शरीरातील ऊर्जेची पातळी वाढण्यास मदत होते
उडीड डाळीमध्ये मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियमसारखी खनिजे असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होऊ शकते
उडदामध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक गुणधर्म असल्याने त्वचेवरील मुरुमांना कारणीभूत असलेल्या जिवाणूंवर नियंत्रण राहते, यामुळे त्वचा चमकदार दिसते
उडदाच्या डाळीचे सेवन केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे, कारण त्यात खनिजे आणि आवश्यक फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात