Deepak Bhandigare
तूरडाळ ही रुचकर, पचण्यास हलकी आणि अत्यंत पौष्टिक मानली जाते
तूरडाळ प्रथिनांनी समृद्ध असून, यामुळे स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते
विशेषतः शाकाहारी लोकांना तूरडाळ हा प्रथिनांचा एक उत्कृष्ट पर्याय आहे
तूरडाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहून बद्धकोष्ठतेसारखी समस्या दूर होते
तूरडाळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे गुणधर्म असतात; जे रक्तदाब नियंत्रणात ठेवून हृदयाचे आरोग्य चांगले राहते
तूरडाळीमध्ये लोह भरपूर असते, ज्यामुळे अशक्तपणा कमी होऊन हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते, ही डाळ विशेषतः महिलांच्या आरोग्यास फायदेशीर आहे
तूरडाळीमध्ये फोलेट आणि व्हिटॅमिन बी असते, जे मनाला ताजेतवाने ठेवून ताण-तणाव कमी करण्यास मदत करते
तूरडाळ शिजवण्यापूर्वी ३० ते ६० मिनिटे भिजत ठेवा, यामुळे त्यातील गॅस निर्माण करणारे घटक कमी होत असल्याचे सांगितले जाते