Rajma Benefits : मेंदुसाठी उपयुक्त अशा राजमाचे अनेक फायदे

sandeep Shirguppe

राजमा खाण्याचे फायदे

राजमा पोषक द्रव्यांनी परिपूर्ण आहे. एका अभ्यासानुसार १०० ग्रॅम राजमामध्ये सुमारे ३५० कॅलरी आणि २४ ग्रॅम प्रथिने मिळतात.

Rajma Benefits | agrowon

पोष्टिक राजमा

राजमात लोह, तांबे, फोलेट, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के यासारखे पौष्टिक पदार्थ आढळतात.

Rajma Benefits | agrowon

वजन होईल कमी

राजमात फायबर असल्याने ते सहज पचतात. सकाळी न्याहारी, दुपारी भाज्या आणि रात्री कोशिंबीर म्हणून यास खाऊ शकता.

Rajma Benefits | agrowon

रक्तदाब नियंत्रित करते

राजमामध्ये चरबीचे प्रमाण कमी असते त्यातील फायबर चरबी कमी करण्यासाठी कार्य करतात यामुळे रक्तदाब नियंत्रण राहते.

Rajma Benefits | agrowon

पचन क्रिया सुधारते

राजमा शिजवलेले आणि सोलून खाल्ले जातात. यामुळे आपल्याला संपूर्ण पोषण मिळते. यातून पचनक्रीया सुधारते.

Rajma Benefits | agrowon

हाडे होतात मजबूत

शरीराची हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. राजमामध्ये कॅल्शियमसह मॅग्नेशियम असतात यातून आपली गरज पूर्ण होते.

Rajma Benefits | agrowon

केस आणि त्वचेसाठी फायदे

राजमामध्ये उपस्थित व्हिटॅमिन सी केसांना सामर्थ्य देते. जर तुम्ही राजमा नियमितपणे खाल्ले तर केसांचा फायदा होतो.

Rajma Benefits | agrowon

मेंदूसाठी उपयुक्‍त

राजमामध्ये व्हिटॅमिन के मज्जासंस्थेस चालना देण्यास मदत करते. त्यात असलेले व्हिटॅमिन के मेंदूतल्या पेशींसाठी आवश्यक असते.

Rajma Benefits | agrowon