Team Agrowon
चिया सीड्स या बियांना मेक्सिकन चिया या नावाने देखील ओळखले जाते. या बियांचे शास्त्रीय नाव सॅल्विया हिस्पॅनिका असे आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस मानवी आहारामध्ये यांचा वापर वाढतो आहे.
चिया सीड्समध्ये कॅल्शिअम, मँगेनीज, मॅग्नेशिअम, लोह, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात.
ओमेगा-३ फॅटी ॲसिड, तंतुमय पदार्थ, प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची अमिनो आम्लेही भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे चिया सीड्सचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरते.
चिया सीड्स हे हृद्यासंबंधित आजार, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण, कर्करोग, पचनक्रियेचे आजार अशा विविध आजारांवर उपयोगी ठरते.
विविध बेकरी उत्पादने, आइस्क्रीम, ज्यूस इत्यादी अन्नपदार्थांचा दर्जा वाढविण्यासाठी चिया सीड्सचा वापर केला जातो. त्यामुळे या अन्नपदार्थांतील पोषक घटकांची गुणवत्ता वाढण्यास मदत होते.
चिया सीड्समध्ये ॲन्टिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीरातून फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत होते.
चिया सीड्समधील अल्फा लिनोलेनिक आम्लामुळे रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
चियाच्या सीड्समध्ये हृदयविकारासह अनेक हृदयासंबंधीत आजारांचा धोका कमी करू शकतो. चिया सीड्समध्ये फायबरदेखील जास्त असते, ज्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
चिया सीड्समध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यात मदत करते. तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.