Jeshthamadh Benefits : चिमुटभर जेष्ठमध खाण्याचे फायदेच फायदे

sandeep Shirguppe

जेष्ठमध खाण्याचे फायदे

आवाज बसला असेल किंवा घसा दुखत असेल तर चिमुटभर जेष्ठमध पावडर या प्रमाणात चघळावी आणि गरम पाणी प्यावे.

Jeshthamadh Benefits | agrowon

कोरडा खोकल्यास गुणकारी

कोरडा खोकला आणि रात्री ठसका लागत असेल तर सितोपलादी चूर्ण आणि जेष्ठमध पावडर मधासह घेतल्यास गुण दिसेल.

Jeshthamadh Benefits | agrowon

बाळांना उपयुक्त

नवजात बाळासाठी ज्येष्ठमधाची काडी मधामध्ये उगाळून चाटवल्यास फायदा होतो. मात्र याची मात्रा तज्ञांना विचारून ठरवावी.

Jeshthamadh Benefits | agrowon

तोंड आल्यास फायदा

खूप तिखट चमचमीत अन्न सेवन केल्यास उष्णता वाढून तोंड येते. अशावेळी जेष्ठमध पावडर तुपात मिसळून लावावी. यामुळे आग कमी होते.

Jeshthamadh Benefits | agrowon

मुळव्याधीचा त्रास कमी होतो

अनेकांना मूळव्याधीचा त्रास असतो. शौचाच्या वेळी आग होणे, रक्त पडणे अशा तक्रारी दिसतात. यासाठी अर्धा चमचा जेष्ठमध पावडर तुपासह जेवणाआधी घेतल्यास आग कमी होण्यास मदत होते.

Jeshthamadh Benefits | agrowon

जेष्ठमध खडीसाखर

उन्हात काम केल्याने, पाणी कमी सेवन केल्याने उन्हाळे लागतात आणि मूत्र विसर्जनावेळी आग होते. अशावेळी जेष्ठमध खडीसाखर आणि तूप एकत्र करून चाटण घ्यावे.

Jeshthamadh Benefits | agrowon

जेष्ठमधाची काडी

कफ जास्त असेल, श्‍वास घेण्यास त्रास होत असेल तर जेष्ठमधाची काडी सतत चघळल्यास खोकला कमी होण्यास मदत होते.

Jeshthamadh Benefits | agrowon

पित्तावर रामबाण उपाय

ज्येष्ठमधाच्या पावडरससोबत मध, तूप आणि आवळ्याचे चूर्ण मिक्स करून त्याचे चाटण खायला देऊ शकता. यामुळे अॅसिडीटीच्या समस्येपासून आराम मिळतो.

Jeshthamadh Benefits | agrowon

डोळ्यांसाठी टॉनिक

ज्येष्ठमधाच्या पावडरसोसोबत त्रिफळाचूर्ण, दूध आणि तूप एकत्र करून प्या. त्यामुळे तुमची दृष्टी चांगली राहण्यास मदत होईल.

Jeshthamadh Benefits | agrowon
seeds | agrowon
आणखी पाहा...