Suran Benefits : हे आहेत आरोग्यदायी सुरण खाण्याचे फायदे

Team Agrowon

सुरण एक कंद पीक आहे. सुरणचे दोन भाग केल्यानंतर ते हत्तीच्या पायाप्रमाणे दिसते. सुरणचे लाल आणि पांढरे असे दोन प्रकार आहेत. यांपैकी, पांढरे सुरण भाजीसाठी वापरले जाते.

Suran Benefits | Agrowon

या वनस्पतीचा हिरवा रंगाचा भाग खाद्यतेलासाठी वापरतात. सर्व वयोगटातील लोकांसाठी सुरण खाण्यायोग्य आहे.

Suran Benefits | Agrowon

मधुमेह असलेल्यांसाठी सूरण चांगले मानले जाते. हिंदू संस्कृतीत दिवाळीच्या उत्सवात सुरण खाण्याची प्रथा आहे. 

Suran Benefits | Agrowon

आतड्यांसंबंधीचे आजार बरे करण्यासाठी सुरण चांगले असते.

Suran Benefits | Agrowon

कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Suran Benefits | Agrowon

हे कमी चरबीयुक्त असल्यामुळे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते.

Suran Benefits | Agrowon

ताजे सुरण खाण्यास चांगले असले तरी याच्यामुळे घसा आणि तोंड खाजवू शकते. त्यासाठी पदार्थ तयार करताना आमसूल पावडर किंवा लिंबाचा वापर करावा.

Suran Benefits | Agrowon