sandeep Shirguppe
हिवाळ्यात शरिर कायम उबदार राहण्यासाठी डिंकाच्या लाडू खाण्याचा अनेकजण देत असतात.
डिंक मध्य पूर्व, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाबमधील काही भागांमध्ये आढळतो.
पुर्वीच्या काळापासून डिंकाचा वापर पोटातील जंत, खोकला आणि घशातील खवखव दूर करण्यासाठी केला जात आहे.
डिंक उष्ण असल्यामुळे हिवाळा सुरू झाला की घराघरांमध्ये डिंकाचे लाडू तयार करण्यात येतात.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य चांगलं राखण्यासाठी डिंकाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू उपयोगी असतात. बाळंतिणीला दूध येण्यासाठी हे लाडू दिले जातात.
डिंकामुळे थंडीत शरीराला ऊर्जा आणि उब मिळते. तर डिंक पाठीच्या हाडाला मजबूत बनवतं.
पचनक्रिया सुरळीत होण्यासोबतच पोटाच्या इतर समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीसुध्दा लोक डिंकाचं सेवन करतात.
एक ते दोन डिंकाचे लाडू खाल्ल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. पण, दोनपेक्षा जास्त लाडू खाल्ल्यास पोट खराब होऊ शकतं.