sandeep Shirguppe
स्वयंपाकघरातील अतिशय महत्वपूर्ण असलेला घटक म्हणजे वेलची. वेलचीचा वापर अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये आवर्जून केला जातो.
चहामध्ये देखील वेलचीचा वापर केला जातो. सर्व पदार्थांच्या रेसिपींमध्ये वेलचीचा वापर केला जातो.
वेलचीची बी, तेल आणि अर्क हा अतिशय प्रभावी आणि औषधी मानला जातो.
जेवणानंतर वेलचीचे सेवन केल्यास माऊथ फ्रेशनर म्हणून वेलचीचा वापर होतो.
वेलचीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिन्ट्स आढळून येतात. जे आपल्या शरीरातील स्नायूंना तंदूरूस्त ठेवण्याचे काम करते.
जास्त प्रमाणात वेलचीचे सेवन केले तर आपल्या शरिरात उष्णता निर्माण होऊ शकते. ज्यामुळे, पोट खराब होण्याची शक्यता असते.
वेलची ही अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणांनी युक्त असल्याने तोंडात वास, दुर्गंधी येत कमी होते.
वेलचीची पूड करून ती पाण्यात उकळून पिल्याने दात किडण्यापासून आराम मिळतो.
छोट्या वेलचीचे सेवन केल्याने अॅसिड रिफ्लॅक्स, पोटदुखी आणि पोटात जळजळ होण्याची समस्या टाळली जाऊ शकते.
वेलचीमध्ये असलेले बायोअॅक्टिव्ह घटक आपल्या शरीरातील पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते.