sandeep Shirguppe
कंदमुळ बीट हे आयुर्वेदिक औषध म्हणून उत्तम कार्य करते. बीट नियमित खाण्याने त्वचा चमकदार होते.
वजनासहित रक्तदाब कमी करण्यासाठी बीट हे कंदमुळ अत्यंत गुणकारी समजले जाते, मेंदूचे कार्यही सुधारते.
बहूतेक जणांना बीट हे आवडत नाही. मात्र, नावडते बीट आयुर्वेदिक औषध म्हणून फीट कार्य करते.
सुश्रुताचार्यांनुसार कंद हे रक्तपित्तहर, थंड, गोड, पचनाला जड, शुक्रवर्धक, स्तन्यवृद्धीकर असतात. हेच बीटाचे गुणधर्म मानले जातात.
पचनशक्ती व्यवस्थित असल्यास बीट कृश व्यक्तींना वजन वाढवण्यासाठी आणि उष्णतेच्या विकारात उपयोगी ठरते.
बीटचा ज्यूस घेण्यापेक्षा बीट चावून खाल्ल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
बीटाचा गाजरासारखा हलवा, भाजी किंवा पराठे बनवता येतात. बीट हे आयुर्वेदिक औषध म्हणून उत्तम कार्य करते.
बीटमध्ये नैसर्गिक नायट्रेट असते. जे शरिराच्या स्नायुंना मजबूत बनवते.
बीटचा रस प्यायल्यानंतर हृदयासंबंधित असणाऱ्या तक्रार कमी होतात, हे अभ्यासातून समोर आलं आहे.