Bajari Bhakri : रोज बाजरीची भाकरी खा अन् आरोग्य सांभाळा

sandeep Shirguppe

बाजरीच्या भाकरी

आपल्या रोजच्या आहारात बाजरीच्या भाकरीला अनन्य साधारण महत्व आहे. यामुळे अनेक घरात बाजरीची भाकरी आवर्जून केली जाते. म्हणून भाकरी खाल्ल्याने अनेक फायदे होतात.

Bajari Bhakri | agrowon

बाजरीत अनेक घटक

बाजरीत कर्बोदके २५ टक्के, फायबर १७ टक्के, प्रथिने २२ टक्के, ७५६ कॅलरीज, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह ६, मॅग्नेशियम हे घटक असतात.

Bajari Bhakri | agrowon

पीठ ग्लुटेन मुक्त

बाजरीचं पीठ ग्लूटेन मुक्त असते. त्यामुळे बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे पोटाशी आणि पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात.

Bajari Bhakri | agrowon

वजन कमी करण्यासाठी मदत

तुम्ही वजन कमी करत असाल तर बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. ही भाकरी खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते.

Bajari Bhakri | agrowon

मधुमेहाच्या रुग्णांना गुणकारी

तसेच बाजरीत असलेल्या प्री-बायोटिकमुळे मधुमेहाच्या रुग्णांनाही डॉक्टर जेवण्यात बाजरी भाकरी खायला सांगतात.

Bajari Bhakri | agrowon

बाजरीत ओमेगा 3 फॅटी ऍसिड

ओमेगा 3 फॅटी अॅसिड हे शरीरासाठी आवश्यक असते, हे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असून ते फक्त अन्नपदार्थांतून मिळते.

Bajari Bhakri | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

बाजरीच्या भाकरीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच बाजरीमुळे तुमच्या शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.

Bajari Bhakri | agrowon

हृदयासाठी फायद्याचे

बाजरीत मॅग्नेशियम, पोटॅशियम हे घटक असल्याने बीपी आणि हृदयाच्या समस्या असलेल्या रुग्णांना डॉक्टर बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला देतात.

Bajari Bhakri | agrowon

शरिरात उर्जा

बाजरीत उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते.

Bajari Bhakri | agrowon
dhananjay munde | agrowon
आणखी पाहा...